थोडंसं माझ्याविषयी...
पर्यटनाची आवड आपल्या सर्वांनाच असते तशी ती मलाही आहे. त्यातही परदेश पर्यटन हा आपला जिव्हळ्याचा आणि मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या स्वप्नाच्या रूपात असतोच. आपण जेव्हा टूर अँड ट्रॅव्हल कंपनी कडून परदेशी व कुठेही जातो तेव्हा आपली टूर हि जास्तीत जास्त आरामदायी व्हावी हि त्यांची जबाबदारी असते आणि तोच त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे खर्चही जास्त होतो हे साहजिकच आहे.
आमच्या ट्रिप आम्हीच प्लॅन करतो त्यामुळं बऱ्याच खर्चात बचत होते, कमी पैशात युरोपची ट्रिप कशी करायची ते इथे तुम्हाला वाचायला मिळेल. पण प्रयत्न म्हणजे नुसतं ती गावं वा डोंगर दर्या, मुझियम पाहणे इथवरच मर्यादित न राहता तिथली माणसं, समाज जीवन, गल्ल्या बोळ, खाऊगल्ल्या, घरं सारं जवळून पाहायला तो देश ते ठिकाण अनुभवायला मला आवडत. त्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्ट, सार्वजनिक ठिकाणं हे माझ्या पर्यटनात प्रामुख्यानं येतं त्यामुळं तिथली माणसं संस्कृती जवळून पाहता येतं. असाच माझा प्रवास मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात एखाद्या देशात कसं जायचं, आम्ही कसे गेलो तिथे काय काय केलं. हे सारं बारीक सारीक बारकाव्यांसह तुम्हास वाचायला मिळेल. त्यावरून तुम्हीही पर्यटनाला जावं, परदेश गमनाचा आनंद घ्यावा असा प्रयत्न राहील.
प्रामुख्याने इथे युरोप च्या देशांविषयी आपल्यास माहिती देण्याचा प्रयत्न राहील, कारण आम्ही ज्या युरोपच्या देशात जाऊन अलोट ते कसं गेलो. कमीत कमी खर्चात तुम्ही तिथे कसे जाऊ शकता हे मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. परदेशात जास्त खर्च हा प्रामुख्याने हॉटेलमध्ये राहिल्याने होतो. त्यामुळं तो कसा वाचवता येईल, हेही इथे तुम्हाला वाचायला मिळेल. तसेच तुमचे काही प्रश्न असतील, तर त्याचेहि उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल. किंबहुना तुमची ट्रिप तुम्ही स्वतः प्लॅन करत असाल तर त्यासाठी मार्गदर्शनहि तुम्हाला मिळेल. परदेश प्रवासाची तयारी कशी करायची त्याची सविस्तर माहितीही इथे तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्हाला तुमचा प्लॅन आखताना सोयीचे होईल.