आज आम्हाला सगळा दिवस पुन्हा फिरण्यासाठीच मिळालेला तर ज्या गोष्टी परवा पाहायच्या राहून गेलेल्या त्या पाहायचं ठरवलं. आणि अर्थातच डेन्युब बघायची होतीच. व्हिएन्नाला येतानाच डेन्युब बघायची हे ठरलेलंच होत. त्यामुळं ट्रेनने प्रथम डेन्युब टॉवरला गेलो. तिथे जातानाचा रस्ताही सुंदर दोन्हीकडे हिरवाईने नटलेला. टॉवरच्या खाली सुंदर गार्डन. तिकीट काढून आम्ही लिफ्टने वर आलो. २५२ फूट...
