• Menu
  • Menu

क्रोएशिअन कुझीन

सोपर्निक हा पदार्थ साधारण आपल्या स्टफ पराठा सारखाच असतो. यात पार्सली पातीचा कांदा, लसूण असे पदार्थ घालून तो बेक करतात.

झागोर्स्की स्त्रुकली ; हा पदार्थ मैद्यापासून बनवतात त्यात अंडी, पनीर इ घालून स्टफीन्ग घालून रोल करून बेक करतात. हे साधारण आपल्या कडच्या पॅटिस सारखा प्रकार. भरपूर कॅलोरी असलेला हा पदार्थ खाताना जपूनच खावा असं वाटतं !!!

रीसोटो -(rissoto) – भाज्यांच्या स्टोक मध्ये शिजवलेला भाताचा प्रकार असतो. ब्लॅक रिसोटो हा त्यांचा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.

सरमा : हि क्रोएशिअन डिश सगळीकडे केली जाते.

डाल्मेशिअन क्युझिन हे मुख्यतः मेडिटेरिअन फूड शी साम्य असलेलं असतं आणि अर्थातच सी फूड हा मुख्य भाग असतो. त्याव्यतिरिक्त हिरव्या भाज्या, पार्सली, लसूण, रोझमेरी हे घटक आणि ऑलिव्ह ऑइल हे असत.

झाग्रेबच्या आजूबाजूला साधारणतः मीट , बटाटे, कंद असे प्रकार प्रामुख्याने येतात.

पेका- हे त्याच्या अनोख्या कुकिंग स्टाईल साठी प्रसिद्ध आहे. एका डिश मध्ये चिकन भाज्यांचे , लसूण, बटाटे ई. तुकडे घालून त्यावर एक तो झाकून त्यावर निखारे ठेवून हे बेक केलं जात.

विस्का पोगका- हे त्यांचं स्ट्रीट फूड आहे हे ब्रेड किंवा जाडसर बनमध्ये टोमॅटो, सार्डीन स्टफ केलेलं असतं. मोठ्या गोल जाडसर पराठ्यासारखं असतं त्याचे त्रिकोणी तुकडे करून ते देतात.

बाकी पिझा बर्गर, पास्ता हे तर युरोपातले सार्वत्रिक पदार्थ असतातच.

क्रोएशिअन फूड हे ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवले जातात.

फ्रीटुले

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *