• Menu
  • Menu

पूर्ण ट्रिपचा किती खर्च आला?

पूर्ण ट्रिपचा खर्च


फ्लाईट तिकीट :

मुंबई-झाग्रेब : ६६,०००/-

व्हिएन्ना -मुंबई : ४७०००/-

प्लिटविस डे ट्रिप : ८५००/-

ज़ाग्रेब स्प्लिट बस : ३२००/-

दुब्रॉवनिक डे ट्रिप बोट फेअर : ८८००/-

स्प्लिट-झाग्रेब : ३२००/-

ज़ाग्रेब-व्हिएन्ना : ३२००/-

साल्झबर्ग डे ट्रिप : ६८००-/

एअर बी एन बी चे भाडे : ४२,३१६/-

या व्यतिरिक्त व्हिजा फी, इथून मुंबई चे जाणे येणे टॅक्सी,तिथले दिवसभरातले खाणे पिणे ई खफिरणे, हा वेगळा आहे. शिवाय काही ठिकाणी एन्ट्री फीस लागते ,जशी कि व्हिएन्ना मध्ये आर्ट हिस्टरी म्युझियम ला किंवा श्कोनब्रून पॅलेस या ठिकाणी. तसेच आम्ही सुपर मार्केट मधून जे खाण्यापिण्याचे पदार्थ घेत असू. बाकी रोज त्या त्या गावात फिरताना लागणारी पब्लिक ट्रान्सपोर्ट तिकिटे इ इ हे सारे खर्च हे आपल्याला येतात. त्याशिवाय शॉपिंग हि असतेच. असे सर्व खर्चासाहित आमच्या  ट्रिपला साधारण  ३,००,०००/ पेक्षा कमीच खर्च आलेला आहे.
इथे आपण पहिले तर झाग्रेबची फ्लाईट घेतल्याने त्याचे जास्त पैसे लागलेले आहेत कारण हे तसं ऑड डेस्टिनेशन असल्याने कमी लोक तिकडे जातात, त्यामुळे भाडे जास्त लागते. तेच व्हिएन्ना वरून बरंच कमी भाडे आहे. तर हा असा फरक पडू शकतो. तसेच राहण्याची ठिकाणंही आम्ही अगदी सिटी सेंटरच्याच जवळची निवडल्याने तेही थोडे महाग असतात. सांगायचा मुद्दा हा कि तुम्ही याही पेक्षा कमी पैशातही ट्रिप करू शकता. शेवटी आपणच ठरवायचं कि किती पैशात ट्रिप बसवायची. फक्त त्या प्रमाणे थोडी फार तडजोड करण्याची तयारी हवी इतकंच.बाकी मी आधी सांगितल्याप्रमाणे आयटेनरी म्हणजे ठिकाणं कशी कोणत्या देशातली निवडता त्यावरही तुमचा खर्च अवलंबून असतो. कारण वेस्ट युरोप हा श्रीमंत प्रदेश असल्याने तिथे सर्वच गोष्टी या त्याच मापकात असतात. पण इस्ट युरोप जे कि पुर्वी साम्यवादी होते त्या ठिकाणी तुलनेने कमी पैशात ट्रिप होऊ शकते.अशा रीतीने तुम्हीही तुमची ट्रिप अगदी आरामात प्लॅन करू शकता. त्यासाठी फक्त थोडं धाडस आणि अभ्यास करायची तयारी हवी. त्याच बरोबर स्वतः सगळी बुकिंग्स, तिकिटं काढण्याची, तिथे गेल्यावरही थोडं विचारपूस करून निर्णय घेण्याची तयारी ठेवावी. पूर्ण ट्रिप व्यवस्थित प्लॅन केलीत तर अगदी आरामात तुम्ही ती करू शकता!त्यासाठी तुम्हाला काही माहिती वा मदत हवी असेल तर मला मेसेज करू शकता मी शक्य ती सारी मदत करेनच!!!!तेव्हा all the best !!! करा प्लॅन आणि निघा युरोप टूरवर स्वतःचे स्वतः!!! 

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *