• Menu
  • Menu

भाग-९: सफर व्हिएन्नाची

पण इथंही सकाळी लवकरच जाग आली, तेव्हा पाच वाजलेले माझा नवरा गेला पाळायला, मी थोडा वेळ लोळत  पडले. थोड्यावेळाने उठले,  मस्त चहा केला सकाळी सकाळी ताज्या दुधाचा चहा म्हणजे स्वर्गीय सुख.

थोड्या वेळाने खाली घोड्यांच्या टापांचा आवाज झाला म्हणून मी खुर्चीवर चढून खाली पाहिलं. खाली एक बग्गी  रस्त्यावरुन एक चाललेली. नंतर बराच वेळा ती इकडून तिकडे जाण्याचा आवाज येत राहिला. बहुदा  फेरीचा मार्ग असावा. खिडकीतून समोरचे सगळी घरं दिसत होती. बहुतेक सगळ्या पाच सहा मजली इमारती.  एकसारख्या एकसारख्या पांढऱ्या रंगाच्या काचेच्या खिडक्या दिसत होत्या. इमारतींचे रंग वेगवेगळे,  कुठे गुलबट कुठे पिवळे, कुठे हिरवे इतकाच काय तो फरक. बाकी सारख्या आकाराच्या सलग इमारतींमध्ये चिंचोळा रस्ता. इमारती जुन्या असल्यामुळे पार्किंगची सोय नाही.  त्यामुळे सगळ्या गाड्या रस्त्यावरच उभ्या दोन्ही बाजूला पण मधल्या जागेतून एकेरी वाहतूक व्यवस्थित चालू होती. इथेही आम्ही फक्त पोलीस आणि अंबुलन्सचाच हॉर्न ऐकला बाकी गाड्यांचा हॉर्न ऐकल्याचं आठवत नाही. रस्त्याच्या बाजूला मोठा फूटपाथ त्यातच अर्ध्या भागावर ती सायकल ट्रॅक होता. थोड्यावेळाने माझा नवरा आला. मग नाश्ता वगैरे करून आवरून बाहेर पडलो. गूगलवर हो होप्सबर्ग आणि शॉनब्रून पॅलेस कुठे आहे, तिथं कस जायचं ते पाहून घेतलं. पण प्रथम कुठं जायचं ते ठरत नव्हतं.

 बाहेर आलो तर लिफ्टपाशी आमच्या ओनरचा नवरा आणि त्याचा बाप दोघेही कुठेतरी निघालेले. त्याने सांगितल आधी शॉनब्रून  पॅलेस करायला जा. म्हणून मग तिकडे निघालो. तोच आम्हाला ‘यु” म्हणजे अंडर ग्राउंड ट्रेन स्टेशन कडे घेऊन गेला. सायकलवरून कुठेतरी चालला होता. त्यालाही त्याच साईडला जायचं होतं.   जाताना आम्हाला स्टेशन दाखवून गेला. हे मेट्रो स्टेशन कालच्या पेक्षा खूपच जवळ आणि रस्ता अगदी सरळ, कुठेही वळायचं नाही काही नाही.पाच मिनिटात स्टेशनला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळलं बाईनं  काल आम्हाला आधीच्या स्टेशनवरच उतरवलं होत. असो.  आम्ही मेट्रोचा दोन दिवसाचा पास काढला. कारण उद्या सकाळी आम्हाला साल्झबर्गला  जायचं होतं,  त्यामुळे उपयोगी पडणार होता. असा पास  स्वस्तही पडतो.

आम्ही पॅलेसच्या स्टेशनला उतरलो. आमच्यासारखीच खूप सारे लोक उतरले. त्यांच्याबरोबर निघालो वर आल्यावर रस्त्याच्या पल्याड पॅलेस दिसत होता खूप गर्दी होती. हा पॅलेस हॉप्सबर्ग राजघराण्याचं जवळ जवळ 300 वर्ष अधिकृत निवासस्थान होत. खास समरसाठीच. शॉनब्रून  म्हणजे सुंदर स्प्रिंग. सध्याचा पॅलेस १७40 ते 50 च्या दरम्यान टेरेसा या राणीनं निऑक्लासिकल स्टाईल मध्ये बांधून घेतला आहे. प्रवेश केल्यावर समोर प्रचंड आवार होत.  मध्यभागी काही पुतळे समोर पिवळ्या रंगाचा राजवाडा. त्याची खिडक्या दारे व कौलारू छप्पर असलेला पॅरिस तीन मजली दिसत होती.

तिकीट काढून पॅलेस बघायला गेलो. फ्रान्स जोसेफ हा सर्वात जास्त काळ गादीवर राहिलेला सम्राट या ठिकाणी राहिला. 21 नोव्हेंबर 1916 ला वयाच्या ऐंशीव्या वर्षी वारला. त्याच्या निधनानंतर हॉप्सबर्ग राजघराण्याचा ह्रास झाला. आणि 1918 साली हा राजवाडा ऑस्ट्रियन रिपब्लिकच्या अमलाखाली आला. 1955 साली त्याचे

म्युझियममध्ये रूपांतर झालं आणि 1996 त्याला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला.

राणी एलिझाबेथ हि जोसेफची बायको अतिशय सुंदर होती. ती एक चालतीबोलती दंतकथाच होती. तिला सीसी या टोपण नावाने जगभर ओळखले जाते. सुंदर काळेभोर, दाट कुरळे मोकळे सोडलेले केस असलेले तीचे फोटो सगळीकडे पाहायला मिळतात. ती तिच्या तारुण्याविषयी आणि सौंदर्याविषयी अतिशय जागृक होती आणि आयुष्यभर तरुणच दिसण्याविषयी आग्रही पण. सम्राट जोसेफचं  तिच्यावर अतिशय प्रेम होतं. पण असं म्हणतात कि तिला जगभर फिरण्यातच जास्त रस होता. बरेचदा ती हंगेरी लाच राहायची. अशीच एकदा जिनीव्हाला गेलेली असताना 1898 साली लुइगी लुचिनी या इटालियन राजद्रोह्यांना तिच्यावर हल्ला केला.  त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आम्ही संपूर्ण पॅलेस पाहण्याचे तिकीट काढलं होतं.  तिथं प्रवेशद्वारावर सगळ्यांना एक रिमोट कंट्रोल सारखं नऊ बटणं असलेलं यंत्र दिलं जातं, ते कानाला धरून अथवा इयरफोन लावून ऐकता येणार असतं. प्रत्येक दालनात त्या त्या दालनाचा नंबर दाबल्यावर त्या त्या दालनाची माहिती त्यावर इंग्लिश मध्ये सांगितली जात होती.जस कि “आता तुम्ही पहिल्या दालनात आहात, सम्राट जोसेफ सर्व जनतेला इथे भेटत असे.” अशी प्रत्येक दालनाची माहिती मिळत होती. अशा चाळीस रूम्स तिथे होत्या.  तिथे राजघराण्यातल्या लोकांच्या बेडरूम ,डायनिंग रूम, सारं आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर आणि उंची फर्निचर ,छतावर केलेली बारीक कलाकुसर, सोनेरी रंगाची केलेली उधळण, खाली अंथरलेले लाल गालिचे सुंदर पेंटिग्ज सारंकाही त्यांच्या वैभवाची साक्ष देतात.

मोठ्ठ बिलियर्ड्स टेबल, बाजूच्या भिंतीवरती लावलेली दरबाराची चित्रं, असं एका दालनात पाहायला मिळालं.वोलनटरूम मध्ये सगळीकडे वॉलनटचंच लाकडी फर्निचर खुर्च्या, टेबल, वरती लावलेली सुंदर मोठाली झुंबरंही दिसतात. जोसेफची स्टडीरूम मात्र साधीशीच सजवलेली, त्याच्या कुटुंबाचे फोटो टेबलवर सजवलेले.  त्याच्या बेडरूममध्ये भिंतीवर त्याचा छोटा बेड, खुर्च्या कोच, टेबल इथेही खूप सारे त्याच्या कुटुंबाचे फोटो लावलेले. समोरच्या भिंतीवर त्याच्या लाडक्या राणीचा तिचा फोटो टांगलेला. एकूण काय त्याचं कुटुंबवत्सल रूप सगळीकडं दिसत होत.

राणी सीसीची ड्रेसिंग रूम तिचा प्रसाधनाचे टेबल-खुर्ची, मोठा आरसा आणि भिंतीवरचं लाल ,सोनेरी नक्षीकाम लक्ष वेधून घेत होतं.  राजा राणीच्या बेडरूम मध्ये दोन बेड एकत्र करून ठेवलेले दिसतात. निळ्या रंगातल्या  नक्षीकामात रंगलेली रूम दिसते. रॉयल फॅमिलीची मोठी डायनिंग रूम, मुलांच्या रूम्स  मिळतात.आरशाचं दालन अतिशय सुंदर आहे. सुंदर मोठाले आरसे, लाल मोठे पडदे, लाल खुर्च्या आणि मेणबत्त्या चे सुंदर स्टॅन्ड फारच अप्रतिम दिसतात.

इथेच एक प्रशस्त असा हॉल आहे, जिथं मोत्झार्टनं  वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्याची कला सम्राटसमोर सादर केली. खिडकीतून समोर विशाल आणि सुंदर सजवलेला, फुललेला बगीचा सहज नजरेस पडावा अशी व्यवस्था केली आहे. एक मोठा 40 मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असलेल उंच छपराच भव्य सभागृह दिसते.  वर छतावर मोठी पेंटिंग, तशीच बाकी सगळ्या भिंतीवरची उंची पेंटिंग्ज  आणि सुंदर सोनेरी नक्षीकामाने सजलेले खांब,भिंती आपल्याला पाहायला मिळतात. खरोखर राजवाडा काय असतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती इथे मिळते. सगळीकडची श्रीमंती पाहून डोळे दिपून जातात आणि हे वैभव आपण डोळ्यात साठवून ठेवत राहतो.

 तिथून बाहेर आलो.  समोर मोठं गार्डन, प्रचंड मोठ्या परिसरात मधोमध हिरवळ, तिच्या बाजूला सुंदर लाल पांढर्‍या फुलांची नक्षी आणि त्याच्या बाजूला चालायला टाकलेली खडी, त्याच्या बाजूला डेरेदार व्यवस्थित कापलेल्या झाडांचा भुलभुलय्या. दोन्ही बाजूला ठराविक अंतरावर उंच खांबांवरती रोमन देवदेवतांच्या, राजांच्या मूर्ती, कोरलेली संगमरवरी शिल्प दिसतात. समोर अगदी टोकाला आडव पसरलेल रोमन देवतांच् मोठे शिल्प आणि त्याच्यासमोर कारंज. त्याच्या मागे टेकडीवर सुंदर नक्षीकाम केलेली कमान दिसते. गर्दी खूप होती.  पण जाणवत नव्हती कारण एवढ्या मोठ्या जागेत माणस अगदीच तुरळक भासत होती. त्या  कारंजा च्या बाजूला गतकाळातील पारंपरिक वेशात लोक फिरत होते. एक-दोन कॅमेरा फोटो काढत होते त्यात म्हातार्‍यांचे एक जोडपं,  बाकी तरुण जोडपी होती. एका पांढऱ्या बघितले व्यवस्था वयस्कर जोडपं बसलेलं चालक पांढरा हाफ शर्ट जॅकेट आणि काळी कॅप घातलेला स्त्रीने निळा मोरपंखी रंगाचा मागेपुढे जाळीदार असलेला गाऊन घातलेला पुरुषांनी आणि ड्रेस पॅन्ट काळसर कोटला ब्राऊन बो लावलेला. बोगीला दोन्ही बाजूला फुलांचे गुच्छ लावलेले.  दुसरी एक तरुणी पूर्ण वर केलेल्या हिरव्या सिल्कच्या गाऊनमध्ये दिसत होती.  तर समोरून ऑफ डिझाईन होत. तिसरी प्लेग्राउंड तरुणी होती.  तिने काळ लाल रंगाचा गाऊन घातला होता. फारच सुंदर होती ती. डोक्यावर टियारा लावून. चौथ्या तरुणीने काळा हिरवा डिझाईन असलेला गाऊन घातलेला. सोबतचा तरुण लाल आणि लॉन्ग ब्राऊन कोट घातलेला होता. दुसऱ्या तरुणांनी पण तसेच लांब काळे कोड घातलेले होते. एक जोडपे वेडिंग ड्रेस मध्ये दिसत होतं. अशी ही सारी मंडळी त्या राजवाड्याच्या

पार्श्वभूमीवर फोटोसेशन करत होती. त्यामुळे आम्हालाही काळाची म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाची अनायासेच सैर झाली

तिकडून मग आम्ही तिकडेच असलेल्या कॅफेटेरियामध्ये मध्ये थोडासं खाऊन आणि ज्यूस पिऊन पुन्हा स्टेशनवर आलो आता इथून होप्सबर्ग पॅलेसला जायचा विचार होता., त्यासाठी आम्ही रिंग स्ट्राज ला उतरलो. समोर खूप साऱ्या ऐतिहासिक इमारती दिसत होत्या. हा व्हिएन्नाचा मध्यवर्ती भाग साधारण दीडशे वर्षापूर्वी सम्राट जोसफ ने हा भाग पुन्हा निर्माण करून प्रशस्त सुंदर रस्ते, प्रोमिनाड बनवले. त्याची संपुर्ण लांबी आठ किमी आहे. इथेच एकसारख्या दिसणाऱ्या दोन इमारती आहेत. एकात आर्ट हिस्टरी म्युझियम आणि दुसर्‍यात नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे. मधोमध मारिया प्लाझं हा महाराणी मारिया चा पुतळा आहे. सर्वोच्च स्थानी ती विराजमान आहे. तिच्या खाली काही दासी (असाव्यात) मग त्याखाली काही सरदारांचे शस्त्रधारी पुतळे असा हा पुतळ्याचा समूह आहे. जणूकाही आजही तिच्या रक्षणासाठी खाली सरदार आहेत. हि महाराणी अतिशय कर्तबगार होती.
तिचं हे यथोचित स्मारक म्हणावं लागेल. हा पुतळा चॅनल उंच आहे. आजूबाजूला छान हिरवळ , आणि नक्षीदार झुडपांनी सजलेला आहे.


आम्ही आर्ट हिस्टरी म्युझिअम ला जायचं ठरवलं. तिकीट काढून आत गेलो. खाली वर सगळीकडे संगमरवराचा वापर केलेला दिसतो. भव्य अष्टकोणी दालनात आपण प्रवेश केल्यावर, वरती जाणारे इतक्यात भव्य जिने दिसतात. प्रत्येक जिन्याच्या तोंडावर वेगवेगळी दालने आहेत, जसं की इजिप्शिअन,रोमन, निओ रोमन, इटालियन ऑस्ट्रेलियन अशी.
भव्य असे लालसर रंगाचे गोल गुळगुळीत मार्बल चे खांब, खालीहि तसेच चौकोनी नक्षीदार संगमरवरी फरशी, छताला गोल घुमट, पिवळसर रंगाचा सुंदर सोनेरी नक्षी सजवलेल्या कमानी, अशा उच्च अभिरुची आणि भव्यतेने आपले स्वागत होतं. मुख्य पायऱ्या चढून वर आलो. इथं समोरच अंतोनिओ कनोव्हा या शिल्पकाराने बनवलेले थिसीस डिफिट्स द कन्टेनिओ (theses defeat the cantenio) हा ग्रीक मायथॉलॉजीवर आधारीत पांढऱ्या संगमरवरात कोरलेला पुतळा आहे. छताला भव्य चित्र लावलेले आहे. असं म्हणतात की हे चित्र मुनकासी या त्यावेळच्या प्रसिद्ध चित्रकाराने काढलं ,पण त्यानं ते दुसरीकडे काढून नंतर इथं आणून लावलं , कारण लावलेले चित्र पाहिलं की आपण मृत्यू होतो अशी अंधश्रद्धा असल्याने त्यांनं काढलेलं ऑपॉयसिस ऑफ रेनेसाँ ( oposis of renessa) चित्र लावलेलं पाहिलं नाही. अतिशय भव्य आणि सुंदर असे चित्र आहे. बाजूला सुंदर नक्षीकामाची फ्रेम त्याला अजूनच देखण बनवते. त्याच्या आजूबाजूलाहि अशीच अनेक सुंदर सुंदर चित्र मध्ये तशाच प्रेम मध्ये लावलेली आहेत. जीन्याच्या बाजूला असलेल्या भिंतीवरदेखील मार्बलच्या रंगबिरंगी दगडांनाही तशाच सोनेरी फ्रेम्स लावल्या आहेत जणू निसर्गही एक कलाकारच आहे हे दाखवायचा प्रयत्न त्यात असावा.
तिथून आम्हीईजिप्शियन दालन बघायला गेलो. तिथेही वेगवेगळ्या असंख्य दालनांमध्ये इजिप्शन पुतळे, मम्मीज, चित्रं असं बरंच काही होते. एका कॅफिन मध्ये छोट्या-मोठ्या स्त्री-पुरुष, बालक यांच्या मम्मीज ठेवलेल्या होत्या. वरच्या बाजूला चारीकडे मध्ये ईजिप्शियन पेंटिंग्ज मधून त्याकाळचे जनजीवन मांडलं आहे. याच दालनात इजिप्त मधील त्या काळातली भांडी, शस्त्र, कपडे, शिलालेख असं बरंच काही पुढच्या दालनात आहेत. न्यूड व्हेरिटाज हे अतिशय सुंदर चित्र आहे. पुढे काही दालनात संगमरवरी पुतळे दिसतात. मग ग्रीक,रोमन दालनात ग्रीक पुतळे , त्या काळातली भांडी, हस्तीदंती कलाकुसरीच्या वस्तू, स्टोन्स, पेन्डन्ट्स ,ऑस्ट्रेलियन राजवंशाचे पुतळे अशा असंख्य वस्तू असंख्य दालनात काचेच्या शोकेसमध्ये ठेवलेल्या आहेत. आपण त्या नुसत्या नजरेखालून घालतो. प्रत्येक वस्तू , त्यावरची टिपणी वाचण्या एवढा वेळ आपल्याकडे नसतो आणि खरं तर त्यात फार इंटरेस्टहि नसतो म्हणा. क्वचित एखाद पेंटिंग जास्तच भावलं तर आपण त्याची माहिती वाचतो. इथंच मे पीटर बेकर,रुडॉल्फ, पिझा बरिगो द एल्डर अशा अतिशय प्रसिद्ध कलाकारांची पेंटिंग्ज आहेत.
त्या नंतर रेनेसाँ नंतरच्या म्हणजे सतराव्या शतकानंतरच्या पेंटिंगवर मायथॉलॉजी चा प्रभाव दिसतो, कारण त्याकाळी चर्चेस खूप श्रीमंत असत आणि ते पैसे देऊन आर्टिस्टकडून चित्र काढून घेत असत. त्यामुळे त्याकाळच्या चित्रांवर मायथॉलॉजी चा प्रभाव दिसतो.
तिथेच एका दालनात शेप ऑफ टाईम या नावाचं एक चित्र आहे. बाहेर प्रवेशद्वारावरपण ते लावलं आहे. त्याची स्टोरी अशी आहे कि त्यात दोन बायकांची वेगवेगळ्या काळात,वेगवेगळ्या कलाकारांनी काढलेली दोन चित्र बाजू बाजू ला ठेवली आहेत. एक चित्र आहे जे हेलेना या रुपगर्वितेचं जे तिचा नवरा रुबन याने काढलं आहे. ज्यात ती नवऱ्याकडे थोडंसं लाजेनं आणि अभिमानही पाहते आहे. दुसरं चित्र हे ईडीस या 1960 सालातल्या मध्यमवयीन अमेरिकन स्त्रीचं आहे जे मारियांनी लिसिंग या स्त्रीचित्रकारांन काढलेला आहे. दोन्ही चित्रात तीनशे वर्षांचा अंतर आहे. दुसरं चित्र हे पूर्ण नग्न असलेल्या बेढब अशा स्त्रीच आहे तीने स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं आहे. अशी अगणित पेंटिंग्ज असलेली मोठमोठाली दालनं फिरताना वेळ कसा जातो कळत नाही. पेंटिंगच्या दालनात त्यांनी मध्ये मध्ये बसण्यासाठी कोचेसची हि व्यवस्था केलेली आहे. उद्देश हा कि ती चित्र आपण निवांत डोळे भरून पहावी व त्याचा आस्वाद घ्यावा आणि अर्थातच फिरल्याने पाय दुखतात त्यामुळे थोडी विश्रांती, असा दुहेरी उद्देश असावा. मला या सगळ्यात छोट्या साधारण तीन वर्षांच्या मुलांचे खेळतानाचे चित्र फार भावलं. त्यांच्या डोळ्यातले निरागस भाव ,त्यांचे सौष्ठव नजर खिळवून ठेवतात. पटकन उचलून घ्यावा आणि पप्पी घ्यावी असं वाटतं. तिथून बाहेर आल्यावर मुझियम ची वेळही संपत आलेली. गार्ड बाहेर निघण्याचे आवाहन करत होता. आम्ही बाहेर आलो पण बाहेर ऊन चांगलंच कडत होतं अजून.
बाहेर येऊन तिथल्याच रिंग स्ट्राज स्टेशन वरून आम्ही आमच्या घराजवळच्या स्टेशन ला आलो. उद्या इथूनच आम्हाला साल्झबर्ग साठी लोकल घेऊन पुढच्या स्टेशनला जायचं होतं घरी आठ वाजले आता थकायला झाले दिवसभर फिरून!!!

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 comments